अमेरीकेत व्हाइट हाऊसमध्ये अब्राहम लिंकन या अमेरीकन राष्ट्राध्यक्षाचे भूत वावरत असल्याचे बरेच किस्से सांगीतले जातात. हे भूत त्यानंतर आलेल्या बर्याच इतर अध्यक्षांना,त्यांच्या बायकांना , काही वेळा व्हाइटहाऊस मध्ये आलेल्या पाहुण्यांना दिसल्याच्या वदंता आहेत. या किश्शांमध्ये सर्वात लोकप्रिय किस्सा आहे अमेरीकेच्या दौर्यावर गेले असताना ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांना अब्राहम लिंकन यांचे भूत दिसल्याचा !!
अब्राहम लिंकनने मेल्यानंतरही व्हाईट हाऊस कसे सोडले नाही ? वाचा अब्राहम लिंकनच्या भुताचे किस्से !!


त्याचे झाले असे की एका संध्याकाळी चर्चील महाशय आंघोळ करून बाथरुमच्या बाहेर नग्नावस्थेतच सिगार ओढत त्यांच्या बेडरुममध्ये फिरत होते. शेजारच्या बेडरुममध्ये कोणीतरी असल्याचा भास झाल्यामुळे ते तसेच पुढे गेले आणि बघतात तर काय, फायर प्लेस समोर अब्राहम लिंकन बसले होते. आता एखादा इसम घाबरला असता पण चर्चील महाशय म्हणाले "गुड इव्हिनींग प्रेसीडेंट, तुम्ही मला भलत्याच अवघड प्रसंगात भेटताय !
या नंतर हा प्रसंग सांगताना चर्चील म्हणाले "अब्राहम लिंकन यांच्या चेहेर्यावर एक मंद हास्य मला दिसले आणि ते दिसेनासे झाले "

(विन्स्टन चर्चील)
असे किस्से कधीच जसे सांगीतले जातात तसे स्विकारले जात नाहीत पण १८६५ साली निधन पावलेल्या अब्राहम लिंकन यांना बघीतल्याचे किस्से अगदी १९८० पर्यंत अनेकांच्या अनुभवास आले आहेत.
विल्यम ममलर नावाच्या एका फोटोग्राफरने अब्राहम लिंकनच्या पत्नीचा जो फोटो काढला आहे त्या फोटोत अब्राहम लिंकन यांचे भूत दिसते असा ममलर सहीत बर्याच जणांचा दावा आहे.

(विल्यम ममलरने काढलेले फोटो)
फ्रँकलीन रुझवेल्ट या अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीने, एलेनॉर रुझवेल्टने अब्राहम लिंकन यांचे भूत पाहिल्याचे म्हटले नाही पण कोणीतरी आसपास वावरत असल्याचा भास त्यांना नेहेमी व्हायचा. असा भास जेव्हा व्हायचा तेव्हा त्यांचा पाळीव कुत्रा कहीही कारण नसताना भुंकायचा असे त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतरच्या आलेल्या अनेक राष्ट्राध्यक्षांच्या अधिकार्यांना असे भास झाले आहेत पण नेदरलँडची राणी विल्हेमा अमेरीकेच्या भेटीवर असताना त्यांना आलेला अनुभव विलक्षणच होता. रात्री कोणीतरी दरवाजावर ठकठक केल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी दार उघडून बघीतले तर त्यांच्यासमोर लिंकनची हॅट आणि कोट हवेत तरंगताना त्यांना दिसला. हे दृश्य पाहून त्यांना भोवळ येऊन त्या बेशुध्द झाल्या.

(नेदरलँडची राणी विल्हेमा)
या शृंखलेतील शेवटचा अनुभव व्हाइटहाउसच्या एका कर्मचार्याला -टोनी सॅव्हॉय-१९८० साली आला. काही कामासाठी हा कर्मचारी व्हाइटहाउमध्ये फिरत असताना एका जिन्याच्या लँडींगवर अब्राहम लिंकन खुर्ची टाकून बसल्याचे त्याला दिसले.
अशा कहाण्या प्रत्येक देशात ऐकू येत असतात. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का ? सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये!