24 वर्षीय दिव्यश्री नाईक ही मोटारसायकल वरून पडली आणि एका टँकर खाली सापडली. ती मागच्या सीटवर बसून प्रवास करत होती. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीस किरकोळ जखमा झाल्या पण दिव्यश्रीला आपले प्राण गमवावे लागले.
पावसाळ्यात आपण अशा घटना नेहमीच वाचतो. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असतात त्यामुळेच बाईक चालवताना अधिक काळजी घ्यायला पाहिजे. पण दिव्यश्रीच्या कथेत एक ट्विस्ट आहे. साधारण एक वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू असाच बाईकवरून पडून एका अवजड वाहनांच्या खाली येऊन झाला होता.
दिव्यश्री आपल्या वडिलांच्या जागी मुंबई पोलिसात भरती होणार होती. त्यासाठी तिने १२वीची परीक्षापण दिली होती. येत्या १५ दिवसात तिचे ट्रेनिंग चालू होणार होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
