युनेस्कोने मोदींची निवड बेस्ट पी. एम म्हणून केली आहे या अफवेला तुम्ही बळी पडलात ना?

युनेस्कोने मोदींची निवड बेस्ट पी. एम म्हणून केली आहे या अफवेला तुम्ही बळी पडलात ना?

काही लोक असतात ज्यांना नासा किंवा युनेस्को अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची नावे घेतलेली कोणतीही बातमी खरी वाटते आणि ही बातमी जर भारताबद्दल असेल तर मग ते अशा लोकांसाठी ब्रह्मवाक्यच असते. एकदा यावर तुमचा विश्वास बसला कि हे लोक व्हॉट्सअपवर या बातम्या एकमेकांना पाठवतात. ही आहे पद्धत इंटरनेट हॉक्स तयार होण्याची.

अशीच एक बातमी व्हॉट्सअप वर येऊन धडकली. आपले लाडके पंतप्रधान मोदी यांना यूनेस्कोने वर्ल्डस बेस्ट पीएम घोषित केले आहे. मग काय युनेस्को आणि मोदी हे दोन कीवर्डस दिसताच लोकांनी हे धपाढप धपाढप व्हॉट्सअप मेसेज ट्वीट्स आणि फेसबुक स्टेटसेसचा पाऊस पडायला लागला. 

काहीवेळाने मग लोकांच्या लक्षात आले. युनेस्कोकडे हा खेळ खेळण्यापेक्षा अधिक महत्वाचे कामं आहेत.ते बेस्ट पी एम पण निवडत नाहीत आणि बेस्ट राष्ट्रगीत पण. तर करा दुर्लक्ष अशा हॉक्सकडे. 

 

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख