जवाहरलाल नेहरूंच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो ? पहा बरं गुगलने काय गोंधळ घातलाय !!

जवाहरलाल नेहरूंच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो ? पहा बरं गुगलने काय गोंधळ घातलाय !!

भारताचे पहिले पंतप्रधान कोण असा सर्च केल्यावर आपल्या समोर कोणाचा फोटो येईल राव ? अर्थात जवाहरलाल नेहरू यांचा. पण सध्या गुगलचा गोंधळ उडालेला दिसतोय. कारण India first PM असा सर्च केल्यानंतर चक्क नरेंद्र मोदी यांचा फोटो येतोय.

स्रोत

गुगल आणि विकिपीडिया आपल्याला कोणतीही माहिती चुटकीसरशी देतात. या माहितीवर आपण विसंबून राहतो. पण काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे असा गोंधळ होतो. गुगलवर आपण जेव्हा कोणताही प्रश्न विचारतो तेव्हा तो उत्तराबरोबर त्याच्या संदर्भातील फोटो सुद्धा घेतो. या कार्यप्रणालीतील बिघाडामुळे काहीवेळा अशा चुका दिसून येतात.

मंडळी, गुगलच्या या चुकीवर सोशल मिडिया चांगलंच पेटलंय. कोणी ट्रोल करत आहे तर कोणी प्रश्न विचारत आहे. शेवटी गुगलने आपली चूक सुधारली आहे हे महत्वाचं. राव यातून एक गोष्ट सिद्ध झाली. ती म्हणजे गुगल सुद्धा १००% खरी बातमी देत नाही.

स्रोत

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख