जगाचा सगळा समतोल हा गुरुत्वाकर्षणामुळे टिकून राहिला आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते तर तिथे किती उठाठेव करावी लागते हे आपण पाहतोच. जग हे पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे हे कुणीही नाकारणार नाही. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो हे तर सर्वांनाच माहित आहे. पण हे पूर्णपणे खरे आहे का? तर नाही. आज एका अशा ठिकाणाची ओळख तुम्हाला होणार आहे जिथे गुरुत्वाकर्षण कामच करत नाही.
अमेरिकेतील नेवाडा आणि अरिझोना यांच्या सीमेवर हुवर नावाचा डॅम आहे. या ठिकाणी जर एखादी वस्तू फेकली तर ती जमिनीवर न पडता चक्क हवेत तरंगते. आता असे का होत असावे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे, हा डॅम धनुष्याच्या आकाराचा आहे. इथून कुठलीही गोष्ट फेकली तर ती बांधच्या भिंतीला लागून हवेत उडायला लागते.

