वस्तूंची चोरी होणे काय नविन गोष्ट नाही. काही जबरदस्त डोक्यालिटी लढवून चोऱ्या करतात. तर काही अशा ठिकाणी चोरी करतात, जिथे त्यांच्या हिमतीला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. लखनऊ येथे चक्क एका मिराज फायटर विमानाचे टायर चोरी झाले आहे.
लष्करी सामानांचे वाहतूक करणारी एक ट्रक जोधपूर जाण्यासाठी लखनऊ एयरबेसवर निघाली होती. चोरट्यांनी ट्रक ट्रॅफिकमध्ये अडकली आहे या गोष्टीचा फायदा उचलून थेट मिराज विमानाचे टायर लंपास केले आहे. या ट्रकचा ड्रायव्हर हेम सिंग रावतने या घटनेची माहिती दिली आहे.
हे टायर कोणी चोरी केले हे अजूनपर्यंत समजू शकले नाही. शहीद पथवर ट्रॅफिक जाम असल्याने स्कॉर्पिओ आलेले चोर मिराजच्या टायरला पट्ट्याने ओढून गायब करते झाले. ड्रायव्हरला हा प्रकार समजेपर्यन्त चोर पसार झाले होते. शेवटी ड्रायव्हरने हा प्रकार पोलिसांना कळवला.
मिराज विमानाचे ५ टायर लखनऊहुन पाठवले जात असताना चोरांनी थेट ट्रॅफिकमधून टायर गायब केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. १२.३० ते १ या भर दिवसाच्या वेळेत ही घटना घडली. फायटर विमानाचे टायर चोरीला गेल्याने पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
पोलीस आता गोष्टीचे महत्व ओळखून खच्चून तपास करतील. टायरचोर पण आज ना उद्या सापडतील, चोर सापडल्यावरच त्यांनी हे टायर बाजारात विकण्यासाठी चोरी केले की इतर कारणासाठी हे स्पष्ट होईल.
उदय पाटील
