काय आहे हा नवा जी एस टी (GST) टॅक्स?

लिस्टिकल
काय आहे हा नवा जी एस टी (GST) टॅक्स?

गुड्स अँड सर्व्हीस टॅक्स (GST)  हा भारताच्या अप्रत्यक्ष कर पद्धतीत झालेला सगळ्यात मोठा बदल आहे. आज संध्याकाळी राज्यसभेने यासाठीच्या घटनाबदलाला मान्यता दिली.  आपण जाणून घेऊयात या करपद्धती बद्दल.

काय आहे GST?

GST हा संपूर्ण भारतासाठी एकच अप्रत्यक्ष कर आहे. यामुळे संपूर्ण भारत देश हा एक बाजारपेठ बनणार आहे. GST हा एकच टॅक्स उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांसाठी असणारा कर आहे.  एखाद्या मालाच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहचणाऱ्या विविध टप्प्यांवर तो लागू होतो.

सामान्य ग्राहकांचा यात फायदा काय ?

सद्य परिस्थितीत कोणत्याही मालाच्या किंवा सेवेच्या किमतीत वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागतात, ह्यात काही छुपे करही होते. राज्य आणि केंद्रस्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष कर होते. पण आता याबदलानंतर एकच टॅक्स लागू होणार आहे.

करचुकवेगिरीला बसणारा आळा आणि सुधारीत यंत्रणा यामुळे कराचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे.

यामध्ये कोणत्या टॅक्सचा समावेश होतो?

केंद्र स्तरावर

 1. सेंट्रल एक्साइज ड्युटी

 2. ऍडिशनल एक्साइज ड्युटी

 3. सर्व्हिस टॅक्स

 4. ऍडिशनल कस्टम्स ड्युटी

 5. स्पेशल ऍडिशनल ड्युटी ऑफ कस्टम्स

 

राज्यस्तरावर

 1. स्टेट VAT/ विक्री कर

 2. करमणूक कर/ सेंट्रल सेल्स टॅक्स

 3. जकात कर

 4. खरेदीकर 

 5. लक्झरी टॅक्स