मिलिंद सोमणसोबत धावतेय त्याची ७९ वर्षांची आई!!!

मिलिंद सोमणसोबत धावतेय त्याची ७९ वर्षांची आई!!!

मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंबई अनवाणी धावत आहे. रोज त्याच्या फेसबुक वॉलवर रोज किती किलोमीटर्स धावला याचे आकडेही येतात. कधी भयंकर उकाडा तर आता लागलेला मुसळधार पाऊस या सर्वांमधून सोमण जगाला फिटनेस मंत्रा देण्यासाठी धावत आहे. हा कार्यक्रम आयोजित केलाय ’द ग्रेट इंडिया रन’ या संस्थेने. 

आज मिलिंद सोमणने त्याच्यासोबत अनवाणी धावणार्‍या आईचा व्ह्डिओ शेअर केलाय. मिलिंद स्वत: ५० वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत आई-मुलगा या दोघांचेही धावणे खरंच स्तुत्य आहे. मिलिंद आणि त्याची आई या दोघांनाही बोभाटा.कॉमकडून शुभेच्छा..