म्हणे १९ नोव्हेंबरला जगबुडी होणार आहे...जाणून घ्या काय खरयं आणि काय खोटंय ?

म्हणे १९ नोव्हेंबरला जगबुडी होणार आहे...जाणून घ्या काय खरयं आणि काय खोटंय ?

जगबुडी होणार हा एक जोक बनलाय राव. उठसूट कोणीपण येतं आणि म्हणतं की अमुक वेळेला जगबुडी होणार, तमुक तारखेला जगबुडी होणार. पण जगबुडी काय साधा भूकंप देखील होत नाही. आताच आलेल्या फ्रेश बातमीवरून असं दिसतंय की १९ नोव्हेंबर २०१७ ही तारीख पृथ्वीचा शेवट असेल. पण काय ओ यावेळी तरी जगबुडी होईल ना ? की मागच्या वेळेसारखा हा पण फुसका बार असेल ? चला जाणून घेऊ हा जावई शोध का लागला आहे ते !!

१९ नोव्हेंबरला काय होईल ?


स्रोत

या दिवशी ‘ब्लॅक स्टार’ नावाची दिव्य आकाशस्त शक्ती पृथ्वीला धडकणार आहे. ही टक्कर एवढी भयानक असेल की पृथ्वीवर सगळीकडे भूकंप होऊन संपूर्ण मानवजातीचा नाश होईल. हा शोध लावला आहे ‘टेरेल क्रॉफ्ट’ नावाच्या शास्त्रज्ञाने. तूळ नक्षत्राच्या काळात ज्यावेळी पृथ्वी सूर्याच्या मागे असेल आणि ब्लॅक स्टारच्या सापेक्ष असेल त्यावेळी ही भयानक टक्कर होईल. आणि ही नेमकी वेळ साधली जाणार आहे १९ नोव्हेंबर रोजी. यावर पुरावे म्हणून टेरेल क्रॉफ्टने अनेक थियरी मांडल्या आहेत.

मंडळी शेवटी एवढंच सांगायचं आहे की पृथ्वीवर बसून पृथ्वीचा नाश होण्याचे अंदाज लावणे आणि खरोखर तसे होणे यात फार मोठा फरक आहे. आता बघूया १९ तारखेला तरी जगबुडी होतेय का ते !!