मुंबई मधल्या या हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही...कारण वाचून धक्का बसेल !!

मुंबई मधल्या या हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही...कारण वाचून धक्का बसेल !!

अंधश्रद्धा पाळू नका हे कितीही ओरडून सांगितलं तरी अंधश्रद्धा आजही समाजात घट्ट आहे. मंडळी साधं उदाहरण आहे. मांजर आडवी गेली म्हणून अनेकजण रस्ता बदलतात. त्यातही जर मांजर काळी असेल तर मग बघायलाच नको. आता काही लोकांना हे माहित असतं की ही एक अंधश्रद्धा आहे पण तरीही आतील मन कधीच हे स्वीकार करत नाही.

आता हेच बघा ना, मुंबई मधील काही हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही. हे हॉटेल्सही साधेसुधे नाही बरं का अगदी फाईव्ह स्टार आहेत !!

 

या अंधश्रद्धेमागील कारण काय ?

स्रोत

याचं कारण म्हणजे १३ क्रमांक सैतानाशी जोडला गेला असल्याने तो अशुभ मानला जातो. हा १३ क्रमांक जर शुक्रवारी असेल तर तो अजून जास्त अशुभ होतो. या १३ नंबरच्या भीतीला “ट्रिस्कायडेकाफोबीया” म्हणतात.

मुंबई मधल्या या ‘स्काय स्क्रीपर्स’ची उंची ३० मजल्यांपर्यंत असली तरी १२ व्या माजल्यानंतर लगेच १४ वा मजला सुरु होतो. यावर आणखी एक पर्याय म्हणजे १३ व्या मजल्याला १२A क्रमांक दिला जातो किंवा त्या मजल्याला M म्हटलं जातं. M यासाठी कारण ‘लॅटीन’ अल्फाबेट मध्ये M हा १३ व्या क्रमांकावर येतो.

स्रोत

मुंबई मध्ये १३ वा मजला वगळण्यामागे काही उदाहरणे दिली जातात. त्यातील एक उदाहरण म्हणजे ‘नरीमन पॉईंट’ जवळील “दि ट्रिडेंट हॉटेल” मध्ये घडलेला प्रकार. या मजल्यावर जे राहिले त्यांना तिथे भुताटकीचा प्रकार दिसून आल्याचं म्हटलं जातं. दुसरं उदाहरण आहे नरीमन पॉईंट जवळीलच आणखी एका हॉटेलात पर्यटकांना आलेला भयानक अनुभव. 

ही अंधश्रद्धा फक्त हॉटेल पुरतीच मर्यादित नाही. ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’च्या इमारतीत सुद्धा १३ वा मजला नाही. त्या ऐवजी १३ व्या मजल्याला S हे नाव दिलं आहे. S चा अर्थ होतो सर्विस रूम.

स्रोत

मंडळी ही अंधश्रद्धा कशी पसरली याबाद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. पण याच्या खुणा सन १९३० पर्यंत मागे जातो. संपूर्ण जगात या प्रकारची अंधश्रद्धा पाहायला मिळते. चीन मध्ये ४, १४ किंवा २४ क्रमांक वगळण्यात येतो कारण चीनी भाषेत ४ क्रमांकाचा उच्चार मरण (Death) असा होतो.

मंडळी भीती सर्वांच्याच मनात असते पण त्या भीतीने आपल्यावर ताबा मिळवला की अशी अंधश्रद्धा तयार होते.