आपले विचार भारताच्या कानाकोपर्यात पोहोचावेत म्हणून अनेक अहिन्दी भाषिक साहित्यिकांनी हिन्दीत आपल्या रचना लिहायला सुरूवात केली. विशिष्ट विचारधारा मानणार्यांनी याद्वारे एक प्रकारे हिन्दीला आणखीनच समृद्ध केले.
असाच एक कवी म्हणजे अवतारसिंह संधू अर्धात ‘पाश’. ‘पाश’ मूळचा पंजाबी. पक्का कम्युनिस्ट. नक्षलींचा पाठीराखा. त्याच्या कविताही क्रान्तीची साद घालणार्या. अगदी सरदार भगतसिंहांशी नाते सांगणार्या. असे असले तरी ‘पाश’च्या क्रान्तिकारी चेहर्याआड एक रोमँटिक तरूणही आहे. रोमँटीक होता होता ‘पाश’ची कविता कशी क्रान्तीचे गीत गायला लागते, ते ऐका स्वरा भास्करच्या आवाजातील अप्रतिम सादरीकरणात.
साम्यवादी पाश, धर्मांध खलिस्तानी चळवळीला विरोध करताना वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडला.
