कालचे महत्त्वाचे निकालः
काल नेमबाजीमध्ये गगन नारंगने क्वालिफिकेशनची फेरी पार केली नाही. मात्र अभिनव बिंद्राने ७व्या रँकसह फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अंतिम स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या सामन्यात (इतका अटीतटीचा की शेवटी तिसर्या स्थानासाठी एकेक गोळीचा स्वतंत्र शूट-ऑफ घ्यावा लागला) अभिनव बिंद्राचे पदक थोडक्यात हुकले व त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
तर पुरुष ट्रॅप स्पर्धेत मानवजीत संधुला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
महिला तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे लक्ष्मीराणी मांझी हिला पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली.
पुरुष हॉकीमध्ये जर्मनी आणि भारताचा सामना बरोबरीत सुटतोय असे वाटत असतानाच शेवटचे तीन सेकंद राहिला असताना केलेल्या गोल मुळे जर्मनीने भारताला २-१ असे हरवले.
महिला हॉकीमध्ये मात्र ब्रिटनने भारताला ३-० असे सहज हरवले.
जलतरण स्पर्धेत शिवानी आणि साजन या दोघांना अनुक्रमे ४१ व २८व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आज काय?:
ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून चौथ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल.
