पीनट बटर म्हणजे शेंगदाण्यापासून बनवलेले लोणी. भारतात हे इतके लोकप्रिय नसले तरी अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये हे प्रचंड लोकप्रिय आहे. जॅम पेक्षा पीनट बटरची लोकप्रियता जास्त आहे असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. शेंगदाणे म्हणजे प्रोटीनयुक्त, उत्साहवर्धक आणि फायबरयुक्त तसेच शक्तिवर्धक असतात. म्हणून त्याला फिटनेस वर्ल्डचे सुपरफूड म्हटले जाते. फिटनेसच्या चाहत्यांना वर्कआउट्सच्या आधी किंवा नंतर पीनट बटर लावलेले सँडविच खायला आवडते.
पण हे पीनट बटर आले कुठून? याचा शोध कोणी लावला याचा इतिहास आज या लेखात घेऊयात.





