टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये अशी साजरी होते आगळीवेगळी होळी..

लिस्टिकल
टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये अशी साजरी होते आगळीवेगळी होळी..

भारतात प्रत्येक ठिकाणी होळी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. ही  शांतिनिकेतनमधली होळी पण अशीच आहे, सगळ्या होळ्यांहून निराळी. इथं होळीच्या दिवशी साजरा होतो वसंतोत्सव... आणि तो अनुभवायला जगभरातून लोक होळीच्या दिवशी तिथं येतात..

बाऊल संगीत

बाऊल संगीत

बाऊल हा बंगाली लोकसंगीताचा एक प्रकार. याच्याशिवाय वसंतोत्सव अपूर्ण आहे.

हा प्रकार बाकी भलातच कठीण आहे बरं का. मुख्यत्वे गुरू आणि भक्त यांच्याबद्दलची गाणी  यात असतात.  गायक एकाच वेळी एका हाताने एकतारी वाजवतो तर दुसर्‍या हाताने कमरेपाशी बांधलेला छोटा डग्गा वाजवतो आणि पायातल्या नुपूरांच्या घुंगरांनी ठेका धरत गोल गोल नाचतही असतो. या संगीतातही गुरू-शिष्य परंपरा असते. प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा नाच बसवला जातो. संधी मिळाली तर किमान एकदा तरी हे बाऊल संगीत अनुभवाच.

वसंतोत्सव..

वसंतोत्सव..

पिवळ्या रंगाला वसंत ऋतूचं प्रतिक मानलं गेलंय. या दिवशी बंगाली स्त्रिया पिवळ्या रंगांच्या साड्या आणि पळसाच्या फुलांच्या दागिन्यांनी सजतात. पळसाच्या फुलांचा दुहेरी उपयोग आहे. त्यांच्यापासून दागिने तर बनतातच, पण भारतात काही ठिकाणी त्यांच्यापासून लालसर नारिंगी रंगही तयार केला जातो. 

पळसाच्या फुलांचे दागिने..

पळसाच्या फुलांचे दागिने..

आहे ना किती कल्पकता!!

पिवळंधम्मक वातावरण

पिवळंधम्मक वातावरण

यादिवशी शांतिनिकेतनचे आजी-माजी सर्व विद्यार्थी इथं यायचा प्रयत्न करतात. इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पण भाग घेतात. बाऊल संगीतासोबतच रविंद्रसंगीतही या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे..

बंगाली संस्कृती

बंगाली संस्कृती

बंगाली गाणी, पारंपारिक तंत आणि बाटिक प्रिंटच्या साड्या हे सगळं तर असायलाच हवं नाही का? गंमत म्हणजे लक्ष देऊन ऐकलं तर ही बंगाली समजायला बिल्कुल अवघड नाही..

बालगोपाळांचाही वसंतोत्सव

बालगोपाळांचाही वसंतोत्सव

लहान मुलंही या समारंभात तितक्यात उत्साहानं सामील होतात..

 

मग काय, पुढच्या वर्षीच्या वसंतोत्सवाची तिकिटं बुक करणार ना मग?