जेव्हा कारचे ‘घोडे’ लागतात...वाचा नक्की काय झालंय मंडळी !!!

जेव्हा कारचे ‘घोडे’ लागतात...वाचा नक्की काय झालंय मंडळी !!!

काय हाय ना मंडळी, पाऊस नीट पडंना झालाय. थोडा थोडा येतो आणि जातोय. सरळ सरळ हूल देतोय मायला. जून म्हयना उजाडला तरी पत्त्या न्हाय.. त्यात इतकं गरम होतंय, तुम्हाला सांगतो असं वाटतंय वाळवंटात बसलोया. आता यापासून आपले प्रानी तरी कशे सुटणार, नाय का ? त्यांना पण गर्मी होते, कपडे घालत नसले म्हनून काय झालं !

आता झालंय असं की गर्मी सहन नाय झाली म्हनून एक घोडा घुसलाय कार मध्ये ! कसा काय? कारमधी एशी असती म्हनून का  तर तसं काय बी नाय...

तर.. झालं असं की जयपूरमधी एका टांगावाल्यानं आपला घोडा उन्हात बांधून ठेवलेला. त्या दिवशी तापमान होतं ४२ डिग्री. गर्मीनं घोडा झाला बेजार. त्याला काय सहन झालं नाय. त्यानं सरळ दोर तोडला अन रस्त्यावरून पळत सुटला. त्यात त्याचा तोंडाला बांधलेली चाऱ्याची पिशवी त्याच्या डोळ्यांवर गेली, पुढचं काय बी दिसंना. अश्यात तो घोडा पब्लिक मधून पळायला लागला. पब्लिक फुल येडी झाली बघून. पन घोडा काय थांबना. अन अश्यावेळी एका कारच्या बोनेटला घोडा धडकला अन दुसऱ्या मिनटाला घोडा डायरेक्ट कारच्या आत. आता आणखी काय होनार/ कार चालवणारा भाऊ आणि घोडा दोघंबी जखमी. पन महत्वाचं काय, तर दोघं पण सुखरूप हायत राव!!!

स्रोत

भौ,  याला म्हणत्यात घोडा जोमात, कारवाला कोमात !!!