उन्हाळ्याच्या सुटीत या ठिकाणी जायचा विचारही करू नका..

लिस्टिकल
 उन्हाळ्याच्या सुटीत या ठिकाणी जायचा विचारही करू नका..

दरवर्षी उन्हाळ्याचा कहर वाढतच चाललाय. ऋतूमान त्या-त्या काळात जसं असायला हवं तसंही राहात नाहीय. आताच्या या एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना पाहूयात, भारतात कुठे कुठे उन्हाळा खूपच कडक असतो तो!

गंगानगर, राजस्थान

गंगानगर, राजस्थान

जरी इथलं सामान्य तापमान ४३ अंश सेल्सियस असलं तरी तिथे उन्हाळ्यात काटा ५० अंशापर्यंत नेहमी जातो.

कुर्नूल, आंध्र

कुर्नूल, आंध्र

इथेही सरासरी उन्हाळी तापमान ४० असलं तरी पारा ४७लाही पोचलाय. या कुर्नूलमध्ये आणि आसपास प्राचीन स्मारकांची रेलचेल आहे.

तितलीगड, ओरिसा.

तितलीगड, ओरिसा.

इथे तापमान ४७ पर्यंत अनेकदा जातं. कायमचा दुष्काळी भाग असलेलं तितलीगड मोठा काळ थर नंतरचं सर्वात गरम ठिकाण मानलं जायचं पण काही शहरं आता हा आकडाही भेदून जातात.

नागपूर आणि वर्धा, महाराष्ट्र

नागपूर आणि वर्धा, महाराष्ट्र

आताही इथे पारा ४३-४४च्या आसपास कबड्डी खेळतोय. अनेकदा इथे पाऱ्यानं ४८अंशांची मजल गाठलीये

राजगढ़, राजस्थान

राजगढ़, राजस्थान

इथेही सरासरी तापमान तब्बल ४६ अंश असतं तर ऐन उन्हाळ्यात ते ५०अंशाच्या आसपास पोचतं.

सर्वात गरम: रेंताचिंतला, आन्ध्र प्रदेश 

सर्वात गरम: रेंताचिंतला, आन्ध्र प्रदेश 


इथली बातच ऐकून तुमच्या आतवर एक उष्ण शिरशिरी जाईल. गेल्या दोन वर्षांत इथे पारा तब्बल ५३अंशावर पोचून आला आहे.

 

आपलं नशीबच आहे कि आपण त्यांच्या तुलनेत जवळजवळ दोनतृतीयांश कमी तापमानात राहतोय. तेथे टिकून राहण्याच्या लोकांच्या जीवनेच्छेला सलाम!!