जाणून घ्यायचंय कोळी कसा जाळं विणतो ते?

जाणून घ्यायचंय कोळी कसा  जाळं विणतो ते?

’स्पायडरमॅन’ कितीही आवडला तरी आपल्या वावराच्या ठिकाणी कोळ्याने जाळं केलं की कधी एकदा ती कोळीष्टकं काढेन असं होतं. पण ही कोळीष्टकं कधी निरखून पाहिलीयेत? 

 

Bu da örümceğin tasarımı (y)

Posted by Harika Tasarımlar on Thursday, April 28, 2016

उन्हाची तिरिप पडल्याने मधूनच चमकणारे आणि एकसमान अंतरावरचे उभे-आडवे धागे, लयबद्ध नक्षी, त्यांचे निरनिराळे आकार.. एवढासा कीटक कसं इतकं मोठं आणि तरीही प्रमाणबद्ध जाळं कसं विणू शकत असेल? निसर्गातल्या अनेक चमत्कारांपैकी हा ही आणखी एक.

हे सर्व होतं कसं हे चित्रित करणार्‍या कॅमेर्‍याचेही आभारच मानायला हवेत. आधी उभे धागे विणून मग आडव्या धाग्यांनी त्यांना आधार देऊन हा कोळीबुवा पाहा कसा आपलं जाळं विणतोय. त्या आडव्या धाग्यांचा त्याने स्वत:च्या आधारासाठी केलेला उपयोग पण लाजवाब!!