अगदी वयात येण्याच्या वर्षांमध्ये एका जाहिरातीची आपण सगळेच वाट बघायचो. हो,आणि आपणच का? बाबा, काका, मामा अशी सगळीच घरातली वयस्क मंडळी त्या वीस सेकंदाच्या जाहिरातीची वाट बघायची. वीस सेकंदात अगदी फ्रेश करून टाकणारी जाहिरात होती, लिरिल साबणाची!
आजूबाजूची हिरवाई, त्यात कोसळणारा धबधबा आणि त्यातून बाहेर येणारी ती एकदम 'टकाटक' सुंदरी!! सोबत ते ला..लल..ला... ला ला ला असे बिनाशब्दांचे गाणे! वाह, मंडळी काय अनुभव होता तो! वीस सेकंदात दिल बाग बाग करणारी लिरिलची जाहिरात!






