(प्रातिनिधिक फोटो)
अंदमान आणि निकोबार बेटे भारताचा भाग आहेत. पण जेवढे आपण देशातल्या इतर राज्यांशी जोडलेले आहोत, तेवढे अंदमान-निकोबार बेटांशी जोडलेले वाटत नाहीत. त्याला कारणे पण आहेत म्हणा. अंदमानचा समुद्र काळे पाणी म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांना सर्वात जास्त त्रास देणाऱ्या कैद्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवले जायचे. मंडळी, असे म्हणतात कि एकदा जो माणूस अंदमानच्या जेलमध्ये जायचा तो परत यायचा नाही, एवढी कडक शिक्षा तिथे दिली जात असे. अर्थात आपल्या देशात ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दलसुद्धा हवी तेवढी आपुलकी दाखवली जात नाही मंडळी!! आपल्याच देशातील लोकांना चीनी म्हणवून हिणवले जाते. असो.








