पॅन कार्डला आधार लिंक करणे लोकांचे अजूनही सुरू आहे. आजवर कित्येकांचे हे लिंक करून झाले आहे. राहिलेले भविष्यात करतीलच, पण अजून एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी लोकांना पॅन लिंक करावे लागणार आहे. ते म्हणजे एलआयसी पॉलिसी. एलआयसीने आपल्या ग्राहकांना संदेश पाठवून आपल्या ग्राहकांनी पॅन विमा पॉलिसीसोबत लिंक करावा असे सांगितले आहे.
ज्यांनी आधीच पॉलिसी घेतली आहे त्यांनाच हे लिंक करावे लागणार आहे. जे नवीन पॉलिसी घेतील त्यांना पॉलिसी घेण्यावेळीच ही सोय उपलब्ध करून देण्यात येईल. पण यातही पॉलिसी पॅन कार्डसोबत का लिंक करावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
एका वेबसाईटनुसार जर तुम्ही पॉलिसीला पॅन लिंक केले असेल तर एलआयसी क्लेम घेताना ग्राहकांच्या नॉमिनीला २ टक्के टॅक्स भरावा लागेल. पण जर पॅन लिंक नसेल तर तब्बल २० टक्के टॅक्स भरावा लागू शकतो. पॅनच्या माध्यमातून एलआयसी इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती पाठवेल.

