आजच्या युगात आधारकार्ड किती महत्त्वाचे झाल आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. शाळेत दाखला घेण्यापासून ते पेन्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड हवेच. हे कार्ड म्हणजे आपण भारतीय असल्याचा पुरवाच असतो. आधार कार्डचा नंबर सरकारी यंत्रणेत आपल्या नावानिशी नोंदलेला असतो, त्यामुळे कुठेही हा नंबर टाकला असता आपल नागरिकत्व आणि इतर इत्यंभूत माहिती लगेच प्राप्त होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की यात तुमची फसवणूक होऊ शकते. याचेच उत्तर आज आपण या लेखात समजून घेणार आहोत.
आपले आधार कार्ड अनेक प्रकारे सुरक्षित करू शकता तसेच काही नियम पाळल्यास त्याचा गैरवापर होणे टाळू शकता. UIDAI नुसार आपल्या आधारकार्डची छायाप्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. यू आय डी एच्या एक नवीन नियमानुसार तुम्ही मास्क्ड आधार वापरू शकता. मास्क्ड आधार म्हणजे १२ अंकी आधार नंबरच्या ऐवजी फक्त शेवटचे चार नंबर दिसतात.
त्याबरोबरच परवाना नसलेल्या खाजगी संस्था, विना परवाना हॉटेल्स आणि सिनेमागृह आधारकार्डची मागणी करू शकत नाहीत. तसेच ज्यांच्याकडे यू आय डी ए आय कडून घेतलेला परवाना आहे,त्यांनाच आधारकार्डचा तपशील मागण्याचा अधिकार आहे.
तरीही आधार कार्डशी निगडीत नागरिकांचा वैयक्तिक डाटा चोरी होण्याच्या तक्रारी येत असतात. अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करणे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स कराव्यात.



