आपण नेहमीच इमर्जन्सी खिडक्या किंवा अग्निशमन यंत्रे पाहतो. पण वापर कसा करायचा हेच ठाऊक नसतं. वेळ काही सांगून येत नाही, त्यामुळे काही गोष्टी कशा वापराव्यात हे ठाऊक असलेलं बरं.
इंग्रजांनी भारताला दिलेली एक खूप उपयोगाची देणगी म्हणजे भारतीय रेल्वे. रोज लाखो लोक रेल्वेमधून प्रवास करतात. या रेल्वेच्या एसी डब्यात असलेली इमर्जन्सी खिडकी कशी उघडावी याबद्दलची माहिती वरच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय. प्रथम भरलेली पाण्याची बाटली किंवा तत्सम जड वस्तूने हातोडासदृश्य वस्तू ठेवलेली खिडकी फोडावी. आता त्या हातोड्यासारख्या दिसणार्या वस्तूने खिडकी फोडायची नाही बरं. तर त्या वस्तूला असलेले रबर खेचत गेल्यास आपल्या खिडकीला लावलेलं रबरी गास्केट निघतं. मग त्या काचेला दिलेले हँडल्स पकडून खिडकी उचलून काढता येते. हा व्हिडिओ अलिकडच्या काळातला असला तरी त्याचं प्रेझेंटेशन अगदी सरकारी दूरदर्शन थाटाचं आहे.
ही कृती अंमलात आणण्याची वेळ कुणावर न येवो, पण जर आलीच, तर या व्हिडिओमध्ये दिलेली पद्धत वापरून आपले आणि सोबतच्या लोकांचे प्राण वाचवा.