फेसबुक हे सध्याच्या काळात, अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते ज्येष्ठ लोक या सर्वांना लोकप्रिय असा प्लॅटफॉर्म आहे. विविध प्रकारची माहिती, फोटो, व्हिडीओ या माध्यमातून लोक आपले मनोरंजन करून घेत असतात. तसेच आपले विचार आणि फोटो ही इतरांबरोबर शेअर करत असतात. आजकाल फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण खूप वाढते आहे. त्यावेळी समजत नाही की नक्की करायचे काय, म्हणून आज आम्ही सांगणार आहोत की फेसबुक अकाउंट हॅक झाल्यावर काय करावे?
हॅक म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. हॅकिंग म्हणजे तुमचं अकाउंट दुसरी व्यक्ती हाताळू शकते. तुमच्या नावाने ती काहीही पोस्ट करू शकते किंवा तुमच्या फेसबुकवरील मित्रांना तुमच्याच नावाने संपर्क करू शकते. अनेकजण असे करून पैशांची मागणी करत असतात. खूपदा अश्लील गोष्टीही म्हणजे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करतात. एखादी लिंक शेअर करून त्यावर पैसे जमा करण्यास सांगतात किंवा तुमच्या खाजगी गोष्टी विचारतात.
त्यामुळे जेव्हा लक्षात येईल की तुमचे अकाऊंट हॅक झाले आहे त्यावेळी सर्वप्रथम तुमचा पासवर्ड ताबडतोब बदला. तुम्ही लॉगिन असाल तर तो लगेच करता येईल. जर पासवर्ड बदलता येत नसेल तर पासवर्ड रिसेट करण्यासाठी विनंती पाठवा. जर तेही होत नसेल तर याचा अर्थ तुमचा ईमेल ॲड्रेस तुमच्या अकाउंटवरून बदलला गेला आहे. पण हे करूनही होत नसेल तर घाबरू नका. यावरसुद्धा उपाय आहे.
या सर्व झालेल्या प्रकाराची तुम्ही फेसबुककडे तक्रार करू शकता. 'रिपोर्ट टू फेसबुक' यावर क्लिक करु शकता. त्यासाठी तुमच्या अकाउंटच्या 'सेक्युरिटी सेटिंग' मध्ये जा. आणि ज्या तिथून तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही लॉगीन आहात ते दिसेल. जर तिथे तुम्हाला लोकेशन (जागा) आणि डिवाइस ( तुम्ही वापरत असलेले साधन) ओळखीची वाटत नसेल तर तिथे तीन डॉट असलेल्या मेनूचे बटण दाबा.
त्यात नॉट यू? ( Not you?) नावाचा एक पर्याय आहे.
तो दाबा. असे केल्याने तुम्ही तुमच्या अकाउंट मधून बाहेर याल आणि तुमचे अकाऊंट सुरक्षित होण्यास मदत होईल.
फेसबुकच्या तुमच्या अकाउंटवरून एक्सेस असलेल्या प्रत्येक ॲप आणि वेबसाइट्सला तुम्ही लॉग इन आहात की नाही हे मात्र नक्की तपासा. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण एखाद्या ॲपला किंवा वेबसाईटला भेट देतो तेव्हा आपण आपल्या फेसबुकच्या अकाउंट वरून तिथे लॉगीन करतो. त्यामुळे ते सुरुवातीला पाहणे अत्यंत आवश्यक आहे. जर ते वेगळे वाटत असेल तर लगेच रिमुव्हचे (remove) बटन दाबा.
आता तुमच्या फोनच्या जनरल सेटिंगमध्ये जाऊन फेसबुकसाठी वापरलेला ईमेल आयडी तपासा. त्या ईमेल आयडीचा पासवर्ड बदला. त्यामुळे हॅकर्सला आता तुमचे अकाऊंट वापरता येणार नाही. नवीन पासवर्ड निवडताना त्यामध्ये अल्फाबेट्स, नंबर्स आणि कॅरेक्टर्स या सर्वांचा समावेश करून बनवा. अजून एक महत्वाची बाब म्हणजे 'टू फॅक्टर ऑथेंटिकेशन' चालू करून ठेवा, जेणेकरून जरी कधी तुमचा पासवर्ड चोरीला गेला तरी तुमच्याशिवाय कोणी तुमचे अकाउंट वापरु शकणार नाही.
तुम्ही योग्य वेबसाईटला भेट देत आहात ना?
हॅकिंग रोखण्यासाठी टू फॅक्टर अथेंटिफिकेशन महत्वाचे असतेच. पण जेव्हा तुम्ही लॉगइन करता तेव्हा
हाच नक्की वेबॲड्रेस वापरता याचीही खात्री करा. जर तो ॲड्रेस ffacebook.com किंवा facebook.this-is-a-security-notification.com तसे बघितले तर अजिबात पासवर्ड टाईप करू नका.
त्यासाठीचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे वेब ब्राऊझर वापरत असाल तर facebook.com असे स्वतः टाईप करा.
आता, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हॅकर्स आपला पासवर्ड कसे मिळवतात?
तर कधी कधी unknown व्यक्तीकडून फेसबुक मेसेंजरवर "पाहिलेस का कोण गेले?" किंवा अशाच काही असा एखाद्या प्रश्नाची लिंक येते. तुम्ही ती लिंक ओपन करता आणि सुरुवातीला ती फेसबुकसारखीच दिसते. परंतु अचानकपणे ते पुन्हा लॉग इन करण्यासाठी पासवर्ड विचारतात. आपण तिथेच चुकतो. आपण ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकतो. तिथे आपला लॉगिन पासवर्ड दिला की पासवर्ड त्यांना कळतो आणि आपले अकाऊंट हॅक होते.
कधीकधी आपण खूप सोपा पासवर्ड वापरतो. १२३४५ किंवा असाच काहीतरी पासवर्ड असू शकतो. आपला फोन नंबर बरेच दिवस वापरात नसल्यास फोन कंपनी दुसऱ्याला तो नंबर दुसऱ्याला देते. ती व्यक्ती आपला सोपा पासवर्ड वापरुन फेसबुकला लॉग इन करु शकते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नसल्यास त्याच फोन नंबरवर लॉग इन कोड येतो आणि त्यांना आपले अकाऊंट सहज मिळते.
त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. आपले पासवर्ड बदलत रहा, सोपे, अंदाज बांधता यावेत असे पासवर्ड्स वापरु नका, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा आणि हॅक झाल्यास वरील उपाय करून पहा.
माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.
शीतल दरंदळे
