मराठी माणसांची भन्नाट विनोदबुद्धी - पुणेरी पाट्या पुण्यापल्याडही तितक्याच भारी!!

लिस्टिकल
मराठी माणसांची भन्नाट विनोदबुद्धी - पुणेरी पाट्या पुण्यापल्याडही तितक्याच भारी!!

मराठी माणसांकडे विनोदबुद्धी भरभरून आहे. पुणेकरांकडे ती जरा जास्तच आहे. किमान शब्दांत कमाल अपमान करण्यात आणि पाट्यांवर इतरांसाठी संदेश लिहून ठेवण्यात पुणेकरांचा कुणी हात धरू शकणार नाही. आजच्या पाट्या या फक्त पुण्यातल्या नाहीत, तर पुणे-ठाणे तर कधी रस्त्यावरचा ट्रक अशा कुठेही मिळालेल्या आहेत. 

तर चला, मराठी माणसांच्या विनोदबुद्धीला मराठीतून दाद देऊयात..

फुकटच्या फुलांनी पूजा केल्यानं काही स्वर्ग मिळत नाही!!

फुकटच्या फुलांनी पूजा केल्यानं काही स्वर्ग मिळत नाही!!

स्पारडरमॅनच्या घराची बेल

स्पारडरमॅनच्या घराची बेल

आतून दार उघडायला कुणी येतं की नाही याची वाट न पाहता नुसती टणाटण बेल वाजवणार्‍यांचा राग योतो ना?

स्वारगेट ते अमेरिका

स्वारगेट ते अमेरिका

भलत्याच महत्वाकांक्षा दिसताहेत!!

कुत्र्याची सेंचुरी

कुत्र्याची सेंचुरी

काय बिशाद आहे कुणाची अशा सेंच्युरीवाल्या कुत्र्यासमोर आतबाहेर करण्याची?

चोरीचा त्रास वाचवा..

चोरीचा त्रास वाचवा..

भलतेच कनवाळू घरमालक दिसत आहेत. बिचारे!!

परखड डॉक्टर

परखड डॉक्टर

’इथं कचरा टाकणारीचा नवरा मरेल’ या वाक्यापेक्षा हा प्रकार पुष्कळच बरा आहे.

डिट्टेलमध्ये सूचना

डिट्टेलमध्ये सूचना

नंतर कुणाची तक्रार नको. म्हणूनच आधीच सगळं व्यवस्थित सांगून टाकलेलं बरं..

वॉशबेसिन कसं वापराल?

वॉशबेसिन कसं वापराल?

सूचना देणं आणि त्यासुद्धा कमीत कमी शब्दात हे खरंच एक स्किल आहे बरं का!

निर्मल गांव योजना

निर्मल गांव योजना

आत्ता कळलं गांव हागणदारीमुक्त कसं झालं ते! पण उघड्यावर बसलेला माणूस कळवल्यावर अधिकारी येईपर्यंत गुन्हेगार  ’काम उरकून’ पळून गेला तर?

दारूबंदीमुक्त ठाणे

दारूबंदीमुक्त ठाणे

हागणदारीमुक्त गावांसारखंच अशा उपायांनी  गांव दारूमुक्त व्हायला हरकत नाही. हो ना?

भावकी!!

भावकी!!

जीवनाचं सार सांगितलं की हो या दोन वाक्यांत!!

किती वेळा आणि कुणाकुणाला सांगू?

किती वेळा आणि कुणाकुणाला सांगू?

म्हणून एकदाच लिहिलं पुढचे प्रश्न थांबतील. लहानपणी ’गळ्यात पाटी अडकवून फिर’ म्हणायचे. इथं फक्त मोठ्ठा फळाच शेजारी ठेवलाय.

यंदा कर्तव्य नाही..

यंदा कर्तव्य नाही..

उगीच वरचेवर स्थळं आणणार्‍या लोकांना वैतागून या कुटुंबावर मुलाचं लग्न ठरल्याचं सरळ जाहीर करण्याची वेळ आली पाहा..