कचर्‍यातून काढा काळं सोनं -ऑरबीन

कचर्‍यातून काढा काळं सोनं -ऑरबीन

आपली महानगरपालिका असो की नगरपालिका, सगळ्यांना एका प्रश्नानं जाम हवालदिल करून ठेवलंय. तो प्रश्न म्हणजे " रोज तयार होणाऱ्या या लाखो टन कचऱ्याची विल्हेवाट कुठे आणि कशी  लावायची?" . दिवसेंदिवस  कचरा  वाढतच चाललाय, गावाचे उकिरडे म्हणजेच डम्पिंग ग्राउंड्स रोज कचर्‍यानं फुगताहेत. मग मध्येच त्यातूनच  आपोआप रासायनिक प्रक्रिया होते आणि आतमध्ये सहज पेट घेणारे वायू तयार होतात. मग ती आग विझवण्यासाठी लोक पाणी पिण्याचं आहे की सांडपाण्याचं हे ही न पाहता पाणी फवारत राहतात आणि सगळीकडे धूर आणि घाण वास भरून राहातो. या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याला लागणार्‍या आगी हा प्रॉब्लेम सोडवणं सोडून उलट ते वाढवतच आहेत .

यावर उपाय म्हणून मृणाल राव व अंजना अय्यर यांच्या कल्पनेतून तयार झाला "Orbin". याची सुरुवात मृणाल राव व अंजना अय्यर यांनी स्वतःच्या स्वयंपाकघरातून केली आणि काही दिवसातच कचऱ्यापासून खत बनवता येणारी हि  कचरापेटी “ऑरगॅनिक बिन” म्हणजेच Orbin या स्वरूपात जगा समोर आली.

या Orbin मध्ये स्वयंपाकघरातील व बागेतील कचर्‍यापासून सकस असे कंपोस्ट व द्रवरूप खत बनवता येते.  या पद्धतीत सेंद्रिय पदार्थाचे हवेतील प्राणवायू व विकरे (एन्झाइम्स) यांच्या मदतीने विघटन घडवून आणले जाते. हे असं खत तयार करणंही काही अवघ/द विद्या नाही. एक साधारण मध्यम आकाराचं खोकं घेऊन त्यात खोक्यात फळांच्या साली , अंड्याची टरफले, चहाची पत्ती वगैरे घालून त्यावर एन्झाइम्स शिंपडावीत. एन्झाइम्स मुळे कचर्‍याचे विघटन होऊन तयार झालेले घन व द्रव रूप खत वेगवेगळ्या कप्प्यात जमा होतं आणि घरची बाग फुलत-फुळत राहाते...
अभिनंदन मृणाल राव व अंजना अय्यर .