व्ही. वैद्यनाथन यांच्याकडे ३१ डिसेंबर २१ पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आकडेवारीनुसार IDFC फर्स्ट बँकेचे २.४४ कोटी शेअर्स आहेत. हे शेअर्स बँकेच्या एकूण इक्विटी शेअरहोल्डिंगच्या ०.३९ टक्के आहेत. तर मार्च २०१९ मध्ये त्यांच्याकडे बँकेचे ५.६८ कोटी शेअर्स होते. सध्या कर्मचाऱ्यांना भेट दिलेले ३.९५ कोटी किंमतीचे शेअर्सची किंमत इतकी आहे कारण सोमवारी बीएसईवर बँकेचा शेअर ४३.९० रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे ९ लाख शेअर्सची किंमत सुमारे ३.९५ कोटी रुपये काढण्यात आली.
वैद्यनाथन हे एक बुद्धिमान आणि दानशूर आहेतच, पण ते एक चांगले खेळाडू आणि कलाकार देखील आहेत. वैद्यनाथन यांनी आतापर्यंत ८ पूर्ण मॅरेथॉन आणि २२ हाफ मॅरेथॉन धावल्या आहेत. तसेच त्यांना गाण्याचीही आवड आहे. ते गाताना गिटारही चांगली वाजवतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गायकीतूनही गरजूंसाठी निधीही उभारला आहे.
व्ही. वैद्यनाथन यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या वागणुकीने एक आदर्श उदाहरणच सर्वांसमोर ठेवले आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही.
शीतल दरंदळे