आज आपण ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारतीय इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. या निमित्त गुगलने भारताला एक अनोखी सलामी दिली आहे. गुगल डूडलच्या माध्यमातून भन्नाट पद्धतीने दिवस साजरा करत असतो. यावेळी प्रजासत्ताक दिनी अश्याच प्रकारचा सुंदर डूडल गुगलने तयार केला आहे आणि हे डूडल भारतीयांचं मन जिंकेल यात शंकाच नाही.

हे डूडल पूर्णपणे भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवते. गुगलने या डूडलबद्दल म्हटलंय की या डूडलचा आकार आणि रंग भारतातील प्रत्येक राज्याचा वेगळेपणा दाखवून देतो. डूडलची पार्श्वभूमी राज्या-राज्यांमधली शिल्पकला, संगीत आणि पारंपारिक पद्धतींचं समृद्ध रूप दाखावून देते. त्याच बरोबर एक प्राचीन वाद्य ‘स्रिंगा’ वाजवणारा माणूस, राजेशाही हत्ती, कठपुतली, विशेष म्हणजे आसाममधील बिहू नृत्य, भारतीय इतिहासातील महत्वाचं असलेलं ‘चक्र’ आणि या बरोबरच मुघल शैली सुद्धा ठळकपणे दिसत आहे.
अशाप्रकारे या एका लहानशा डूडलमध्ये संपूर्ण भारत सामावलेला आहे.
