या काश्मिरी तरुणाचा रेल्वे स्टंट बघून मुंबईच्या स्टंटबाजांची आठवण येईल राव !!

या काश्मिरी तरुणाचा रेल्वे स्टंट बघून मुंबईच्या स्टंटबाजांची आठवण येईल राव !!

या दोन दिवसांमध्ये रेल्वेशी निगडीत २ घटना घडल्या. पहिली घटना हैद्राबादची होती. एक तरुण ट्रेन जात असताना बाजूला उभा राहून सेल्फी काढत होता. पण ट्रेन आणि आपल्यातील अंतर किती कमी आहे हे त्याला माहित नव्हतं. अश्यात चालत्या ट्रेनची त्याला जबरदस्त धडक बसली आणि तो जागीच लोळागोळा झाला. त्याचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार त्यानेच काढलेल्या व्हिडीओत कैद झालाय.

मंडळी दुसरी घटना काही दिवसांपूर्वीची आहे. काश्मीर मध्ये एका मुलाने जीवघेणा स्टंट करून व्हिडीओ व्हायरल केला. ट्रेन जात असताना तो चक्क ट्रॅकवर झोपला होता. पण ट्रेन आणि ट्रॅक यात बरीच मोठी जागा असल्याने त्याला साधा ओरखडाही आलेला नाही. आता हा पराक्रम व्हायरल झाल्यावर थेट पोहोचलाय जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांचा पर्यंत. ओमर साहेबांनी त्याला खडे बोल सुनावलेत. त्यानंतर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पकडले गेल्यानंतर त्याने माफी मागून पुन्हा असा स्टंट करणार नाही हे काबुल केलंय.

या दोन घटना तरुणांच्या बाबतीत आहेत. सळसळत रक्त, काहीही करून जाण्याची इच्छा शक्ती, निडरपणा तरुणांमध्ये असतोच पण हा सगळा उत्साह चुकीच्या गोष्टींमध्ये लागल्याने जीव जाण्याची जास्त शक्यता असते. मुंबई सारख्या भागात जिथे रेल्वे म्हणजे मुंबईचा अविभाज्य भाग आहे आणि अपघात म्हणजे रोजचीच घटना तिथेही असे स्टंट तुम्ही पाहू शकता.

हा व्हिडीओ पहा राव  :

२०११ किंवा त्या दरम्यान हा व्हिडीओ प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये होता. तुम्हीही हा व्हिडीओ बघितला असेल. व्हिडीओ मध्ये तो मुलगा आपल्या बोटांच्या आधारे रेल्वेला लटकून वेगवेगळे स्टंट करतोय. त्याने केलेलं काम आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाही. हा व्हिडीओ जुना असला तरी आजही हा प्रकार चालू आहे. असं म्हणतात की या तरुणांना स्टंट करण्यासाठी पैसे मिळतात. मुलांमध्ये ५०० ते २०,००० पर्यंत पैज लागते. मग रेल्वेच्या वर असलेली हजारो व्होल्टची ‘ओव्हर हेड’ वायर पकडण्या पर्यंत या तरुणांची मजल जाते.

पैश्यांसाठी असेल किंवा मजेसाठी पण यासाठी जीवाची किंमत मोजावी लागते हे नक्की. सांगण्याचा मुद्दा एवढाच की तारुण्यातील रग जिरवायची असेल तर काही तरी मोठं काम करा राव...या असल्या करामती तर माकडं पण करतात !!