सध्या सोशल प्लॅटफॉर्ममुळे अनेक जण चांगली कमाई करत आहेत. यात जर एखाद्या विषयात तुम्ही पारंगत असाल तर मग किती कमाई होईल याची गणतीच नाही. होय! याचे उत्तम उदाहरण म्हणजे २७ वर्षीय कॅट नॉर्टन! हे नाव तुम्ही कदाचित ऐकले नसेल, पण तिने मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑनलाइन शिकवण्यासाठी तिची मोठ्या कंपनीतली नोकरी सोडली आणि आज ती करोडो कमवत आहे!
इंस्टाग्रामवर कॅट @miss.excel म्हणून ओळखली जाते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एकदम कामाचे सॉफ्टवेअर आहे. आपण त्यातल्या १०%ही सुविधा वापरत नसू. पण ते जितके सोपे, तितकेच कठीण सॉफ्टवेअर समजले जाते. यात काही functions, स्क्रिप्टस् तर समजायला खूप अवघड असतात. पण कॅट नॉर्टनने ते अगदी सोपे केले आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये तिने Instagram आणि TikTok वर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यात तीने एक्सेल Google Sheets च्या टिप्स आणि युक्त्या देण्यास सुरुवात केली. ती हे सर्व खूप सोप्या पद्धतीने ती शिकवू लागली. त्यामुळे तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. केवळ एका वर्षाच्या आत Instagram आणि TikTok वर तिचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. जोरदार कमाई सुरू झाली आणि तिचे जीवन अक्षरशः बदलून गेले.

