भारतात अनेक प्राचीन जागतिक वारसा लाभलेली पर्यटन स्थळे आहेत. अनेक गड, किल्ले, महाल, गुहा, लेणी तर अनेक वर्षे जुनी आहेत. ज्यांचे संवर्धन झाले आहे अश्या प्राचीन जागा किंवा स्मारकं पाहायला उत्सुकता सगळ्यांच्या मनात असतेच. पण तुम्हाला जगातील सर्वात जुने स्मारक माहिती आहे का?
न्यूग्रेंज हे जगातले सर्वांत जुन्या स्मारकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे इजिप्त येथील गिझाच्या पिरॅमिडपेक्षाही जुने आहे. बसला ना धक्का? पण हे खरे आहे.
आज या लेखाद्वारे भेट देऊयात आयर्लंडमधील जागतिक वारसा लाभलेले न्यूग्रेंज या स्मारकाला आणि पाहुयात इथले वैशिष्ट्य काय आहे.








