इस्रायली स्वीमर्समुळे माधुरी दीक्षित ट्रेंड का होत आहे? हा व्हायरल व्हिडीओ पाहून घ्या!!

इस्रायली स्वीमर्समुळे माधुरी दीक्षित ट्रेंड का होत आहे? हा व्हायरल व्हिडीओ पाहून घ्या!!

सध्या सगळं वातावरण ऑलिम्पिकमय झाले आहे. रोजच्या रोज खेळाडूंच्या जय- पराजयाच्या बातम्या येत असतात. त्यातच मैदानाबाहेरील अनेक व्हिडीओ आणि फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याच गोष्टीत नव्या भन्नाट व्हिडिओची भर पडली आहे.

बॉलीवूडची क्रेझ देशातच नाही, तर परदेशात पण तुफान आहे हे सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत असतात. यातच इस्रायली स्वीमर्सने माधुरी दिक्षितच्या आजा नचले गाण्यावर डान्स करून ही गोष्ट परत अधोरेखित केली आहे.

ईस्त्रायल कडून ईडन ब्लेचर आणि शैली बॉबरिस्की यांचे स्विमिंग प्लस डान्स असा हा व्हिडिओ वायरल झाला आहे. आर्टिस्टिक स्विमिंग ड्यूएट फ्री रूटीन राऊंड दरम्यान या दोघींनी हा डान्स सादर केला.

या दोन्ही स्वीमर्सच्या गाण्याची निवड अफलातून आहे याबद्दलही त्यांना लोक दाद देत आहेत. साक्षात माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्सचा हा व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणावर वायलर झाला आहे. या व्हिडीओवर लोकांकडून भन्नाट प्रतिक्रिया पण येत आहेत.

या व्हीडीओच्या निमित्ताने मात्र बॉलिवूड जगभर किती रुळले आहे याचा पण प्रत्यय आला आहे.