काल दिवसभर आणि आताही घटनेच्या कलम ३५ (ए) आणि कलम ३७० याची चर्चा सर्वत्र म्हणजे आपसातल्या चर्चेतून -वर्तमानपत्रांतून आणि वेगवेगळ्या मिडीयातून आपल्यापर्यंत पोहचली आहे. असे असताना आज 'बोभाटा'च्या माध्यमातून आम्ही काय वेगळे करणार आहोत असा प्रश्न तुमच्यासमोर साहजिकच उभा राहील. आज बोभाटाच्या माध्यमातून एक मत-मतांतर नसलेले 'डॉक्युमेंट' तयार करावे असे या लेखाचे प्रयोजन आहे. येणार्या काळात वेगवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांत, नोकरीच्या मुलाखतीत ३५ (ए) आणि कलम ३७० या विषयावर जे प्रश्न विचारले जातील त्यासाठी संदर्भ म्हणून हे 'डॉक्युमेंट' तयार असावे हा आमचा दृष्टीकोन आहे.
या दस्तावेजाची लेखाच्या स्वरुपात आम्ही सुरुवात करत आहोत. त्यात वाचकांनी भर घालावी अशी अपेक्षा आहे. कृपया अशी बहुमोल भर घालताना 'फॅक्ट आणि फिगर्स' असे त्याचे स्वरुप असावे अशी अपेक्षा आहे. २१ अपेक्षित असे या लेखाचे स्वरुप आहे.










