भारतात तुम्हांला सगळ्या प्रकारचे लोक सापडतील. खवय्ये तर खूपच सापडतील. काहीजण सगळीकडे फिरून विषय शेवटी खाण्यावरच आणताना दिसतात. काही तर बसल्या बैठकीत खूप खाण्याची ताकद आणि वेगासाठी ओळखले जातात. अशा सगळ्या खवय्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
'आज कुछ तुफानी' करण्याची आवड असणाऱ्या आणि तीही खाण्याच्या शौकीन लोकांसाठी दिल्लीला एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे कॉम्पिटिशन जिंकल्यावर तुम्हाला तब्बल ३४ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे राव!! काय आहे ही स्पर्धा? तर मंडळी, एका तासात ३४ इंचाचा पिझ्झा संपवायचा आहे. घरी आणलेला पिझ्झा काही सेकंदामध्ये खाऊन टाकणाऱ्या लोकांनी तर या कॉम्पिटिशनमध्ये सामील होण्याविषयी जरूर विचार करावा.






