आता जिओ केबल कंपन्यांचाही जीव घेणार का ?

आता जिओ केबल कंपन्यांचाही जीव घेणार का ?

टेलिकॉम क्षेत्रात सर्वांचा बँड वाजवल्यानंतर रिलायन्स जिओ आता डीटीएच क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. सोशल मिडीयावर जिओच्या सेट टॉप बॉक्सचा फोटोही फिरत होता. हे खरे कि खोटे ते अंबानीलाच माहित !!!

या मेसेजमध्ये काय काय सांगण्यात आले आहे ?

जिओच्या डीटीएच सेवेत 360 चॅनल्स असतील, त्यापैकी 50 चॅनल्स एचडी असतील. इथेही जिओ स्वस्तात मस्त देण्याच्या तयारीत आहे, ते म्हणजे आधी तर सेट टॉप बॉक्सची किंमत असेल फक्त ४५० रुपये आणि पहिल्या ६ महिन्यासाठी ३६० चॅनेल्स मोफत असतील. सहा महिन्यानंतर ३६० चॅनेल्ससाठी दरमहिन्याला१२० रुपये  मोजावे लागतील.  या आधीच जिओ डीटीएच क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या.

या बद्दल तूर्तास जिओकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. जर हे खरे ठरले तर डीटीएच क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडणार हे मात्र नक्की. 
आधी टेलीकॉम, आता डीटीएच पुढे काय?

जाता जाता एक प्रश्न : रिलायंस जिओ हळू हळू पतंजली सारखं होत चाललंय का ?