असं म्हटलं जातं एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे या पेक्षा दुसरा आनंद नाही. आता हसण्यासाठी तुम्हाला कपिल शर्मासारखे विनोद जमलेच पाहिजे तर तस काही नाही. फक्त समोरच्याला एक स्माईल मागितली तरी काम होऊन जातं आणि जर गुदगुल्या केल्या तर बेश्टच.
आता हे ताज उदाहरण बघा. ‘जय विन्स्टन’ या फोटोग्राफरने भारत, नेपाल, ऑस्ट्रेलिया या सारख्या देशात फिरून लोकांचे स्माईलवाले फोटो काढले आहेत. यात नवीन असं काय ? तर त्याने एकच माणसाचे दोन फोटो काढले. एक स्माईल देण्यापूर्वीचा आणि दुसरा स्माईल देण्यानंतरचा. दोन्ही मधला फरक तुम्ही साफ बघू शकता. विन्स्टनने एका इंटरव्यूव मध्ये म्हटले आहे कि ‘मी जेव्हा त्यांना एक स्मित द्यायला सांगायचो तेव्हा त्यांचा चेहरा भलताच उजळायचा...रंग, देश, धर्म, जात यापलीकडे जाऊन आमच्यात काहीतरी साम्य असल्याचं या फोटोकडे बघून कळतं”
माणूस कुठचा पण असो पण स्माईल तो सेम होती हे ना बॉस...हे फोटो बघून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत एक स्माईल येईल....










बोललो होतो ना स्माईल येणार !!!

