अहो राव, उधळपट्टी काय असते ते आज आम्ही तुम्हाला सागतो....इतिहासात म्हणे क्लिओपात्रा गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची. आता ती होतीच मुळात राणी, मग ती काहीही करू शकते. पण आजच्या काळात जर असं कोणी करू लागलं तर त्याला लोक वेड्यात काढतील. तरीही काही असतात बरं का, जे याहून पुढे जातात आणि अजब काही तरी करतात.

आता उदाहरणच द्यायचं झालं तर या बाई बघा. या आहेत मोहम्मद जहूर या पाकिस्तानी अब्जाधीशाच्या पत्नी ‘कमालिया’. सध्या यांच्याबद्दल चर्चा होत आहे ती यांच्या अंघोळीसाठी. या चक्क शॅम्पेनने अंघोळ करतात म्हणे. आता शॅम्पेन म्हणजे दुध नाही जे किरण मालाच्या दुकानात मिळेल. पण पैसा असेल तर सगळं शक्य आहे मंडळी.. कमालिया रोज ५००० किमतीच्या २० ते ३० बॉटल शॅम्पेन अंघोळीसाठी वापरतात. वर्षाचा हिशोब बघता हा कोट्यावधीचा मामला आहे राव. शॅम्पेनमुळे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते असं त्यांचं मत आहे. त्यांनी तर लोकांनाही शॅम्पेनने अंघोळ करण्याचा सल्ला दिलाय (बाबो !!)....एका अब्जाधीशाला काही कोटी रुपये अंघोळीसाठी लागत असतील तर त्यात वावगं काय ?

मोहम्मद जहूर आणि कमालीया जहूर आपल्या दोन मुलींसोबत हे उक्रेनची राजधानी कीव्ह येथे राहतात. कमालीया एक पॉपस्टार असून मोहम्मद बिझनसमन आहे. २२ नोकर, अलिशान घर, काही लाख रुपयांचे कपडे असा या दोघांचा श्रीमंत संसार आहे. दोघांनाही त्यांच्या आलिशान लाईफस्टाईलसाठी ओळखलं जातं. कमालीया यांच्या अंघोळीच्या पद्धतीबद्दल काही वर्षांपूर्वी खबर व्हायरल झाली आणि या चर्चांना उधाण आलंय....
.
.
.
ते सगळं जाउद्या भाऊ, आपल्यासाठी गरम पाणीच ठीक आहे....नाही का? आणि तसंही थंडीच्या दिवसात कोण अंघोळ करतंय?