ट्रेडमार्क म्हणजे काय ? ट्रेडमार्क रजीस्ट्रेशनचे बारकावे जाणून घ्या आणि यशस्वी ब्रँड तयार करा.

लिस्टिकल
ट्रेडमार्क म्हणजे काय ? ट्रेडमार्क रजीस्ट्रेशनचे बारकावे जाणून घ्या आणि यशस्वी ब्रँड तयार करा.

ट्रेड मार्क
एकेकाळी माकड छाप दंतमंजन खूप लोकप्रिय होते. डबीवरील माकडाच्या चित्रावरून ते ओळखले जायचे. ट्रेडमार्कचा फायदा हाच, की तो पाहिल्यावर बघणाऱ्याला विशिष्ट वस्तू, सेवा आठवतात. ज्या काळात शिक्षणाचा प्रसार नव्हता, म्हणजे उत्पादनाचे वा उत्पादकाचे नाव वाचून खरेदी होत नसे, तेव्हा याला महत्त्व होते. आता जागतिकीकरण होत असताना याला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले, कारण या योगे भाषेचा अडसर काही प्रमाणात दूर करता येऊ लागला.

ट्रेडमार्क म्हणजे असे काहीही जे (1) एक चिन्ह (मार्क) असले पाहिजे,2) चित्रांकित करता यायला पाहिजे, 3)अन्य अशाच चिन्हांपासून भिन्न असायला पाहिजे,4) काही विशिष्ट वस्तू वा सेवा संदर्भात वापरले जात असावे वा वापरले जाणार असावे.
ट्रेडमार्कमध्ये नाव (असू शकते पण असणे आवश्यक असते असे नाही), चिन्ह वा दोन्ही असू शकते आणि त्याची नोंदणी नाव, चिन्ह, लेबल अशी करता येते. ट्रेडमार्क हा हक्क अर्ज करून नोंदणी करून मिळवावा लागतो. ट्रेडमार्क हा कोणत्याही मालमत्तेवरचा हक्क नसतो, पण ती एक मालमत्ता असल्याने विकता येते.

ट्रेडमार्कची नोंदणी केली गेली असेल, तर अन्य कोणी तो मूळ मालकाच्या पूर्वसंमतीशिवाय वापरू शकत नाही. असा वापर केला गेला तर तो एक दंडनीय गुन्हा ठरतो.
ट्रेडमार्क हा विशिष्ट वस्तू आणि सेवांसाठी मिळतो. म्हणजे समजा, मी शर्टबाबत एखादा ट्रेडमार्क नोंदणी करून घेतला आहे. उद्या जर मी हे नाव पँटसाठी वापरायचे ठरविले तर त्यासाठी मला वेगळी नोंदणी करून घ्यावी लागेल.
कोणाही व्यक्तीला ट्रेडमार्कसाठी अर्ज करता येतो. येथे व्यक्ती हा सर्वसमावेशक शब्द आहे. यात भागीदारी संस्था, एकल मालक संस्था, कंपन्या वगैरे येतात. भागीदार नसलेल्यांना सुद्धा संयुक्तरीत्या ट्रेडमार्क नोंदविता येतो.

ट्रेडमार्क कसा असावा आणि कसा नसावा, याबाबत कायद्यात काही तरतुदी आहेत, त्यांपैकी काही अशा आहेत

ट्रेडमार्क कसा असावा आणि कसा नसावा, याबाबत कायद्यात काही तरतुदी आहेत, त्यांपैकी काही अशा आहेत

1) त्यात सर्वोत्तम, चांगले, योग्य असे प्रशंसात्मक शब्द नसावेत, तसेच मालाच्या गुणवत्तेशी संबंधित शब्द नसावेत.

2) केवळ वस्तूचे चित्र हा ट्रेडमार्क होऊ शकत नाही, उदा. सफरचंदाचे चित्र हे सफरचंदापासून बनणाऱ्या उत्पादनांचा लेबल प्रकारातला ट्रेडमार्क होऊ शकत नाही.
3) सर्वसाधारणपणे सेवा आणि वस्तूंची गुणवत्ता, उपयोगिता, संख्या मूल्य, ते बनण्याचे ठिकाण याचा ट्रेडमार्क होऊ शकत नाही.

4) अस्तित्वात असलेल्या ट्रेडमार्कशी नामसाधर्म्य किंवा ध्वनिसाधर्म्य नसावे. या कारणासाठी 'cadbury' शी ध्वनिसाधर्म्य असणारा kadbery' हा शब्द चॉकलेटचा ट्रेडमार्क होऊ शकत नाही.

5) आकार किंवा आकारमानामुळे एखाद्या वस्तूला मूल्य प्राप्त होत असले तरी ते वैशिष्ट्य, ट्रेडमार्क होऊ शकत नाही.

7) त्यात अश्लील वा बीभत्स असे काही नसावे.
8) सहज कोणाची फसगत होईल असे ते नसावे.
9) राष्ट्रीय ध्वज व चिन्हे ह्या संबंधीच्या कायद्यातंर्गत त्याला बंदी नसावी.
10) अन्य कुठल्याही कायद्यानुसार त्यावर बंदी नसावी.
11) जर ट्रेडमार्क कोणा जिवंत व्यक्तीशी संबंध सूचित करत असेल, तर त्या व्यक्तीची लेखी संमती घेणे आवश्यक ठरते आणि जर अशी व्यक्ती अर्ज करण्यापूर्वी
वीस वर्षांत मृत्यू पावली असेल, तर त्या व्यक्तीच्या वारसांची संमती मिळविणे आवश्यक ठरते.