आपण भारतीय मुळात भलतेच देवभोळे. त्या देवाला खूष करण्यासाठी आपण नाना तर्हेची भक्ती, व्रत, उपवास करत असतो. आणि या उपवासात आपण हमखास साबुदाणाच खातो. पण हा साबुदाणा नेमका तयार कसा होतो ? जरा वाचून बघा...
खास करून उत्तर भारतीयांचा फेव्हरिट असलेला हा टपोरा साबूदाणा तिकडे दक्षिण भारतात तयार होतो. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये साबुदाण्याच्या फॅक्टरीज आहेत. 'सागो' नावाच्या गोड कंदमुळापासुन हा साबूदाणा तयार होतो. सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात हे कंद खरेदी केले जातात आणि साधारण ३०-४० फूट खोल खड्डे खणून त्यात हे कंदमूळ महिनाभरासाठी आंबवायला साठवलं जातं. दरम्यान हे कंद कुजून त्याचा घाणेरडा वास सुटलेला असतो, रात्री लाईटमुळे आलेली अनेक पाखरे, किडे या लगद्यात पडतात. हा लगदा कुजल्यामुळे यात मोठ्या आळ्या तयार झालेल्या असतात. हे सगळं सडलेलं कृमीयुक्त मिश्रण तसच क्रशरमध्ये अनेक वेळा बारीक केलं जातं. आणि शेवटी त्याचा लहान गोल साबुदाणा बनवून पॉलीश करून विकला जातो.
आता तुम्हीच विचार करा उपवासाला तुम्ही काय काय खाताय !! हवं तर याचा विडीओ बघून घ्या यु-ट्यूब वर. आता समजलं ना देव तुमच्यावर अजून का प्रसन्न नाही झाला ते ?
