इन्स्टंट मेसेजींग अॅप व्हाट्सअॅपने आपल्या अॅप मध्ये आता काही नवीन आणि इंटरेस्टिंग फीचर्स अॅड केली आहेत. कोणती आहेत ती ? या पाहूया...
नवीन अपडेट मध्ये व्हाट्सअॅप कॅमेरावर काढलेल्या फोटो आणि विडीओजवर आता आपण टेक्स्ट लिहू शकतो आणि सोबत आपल्याला आवडेल ती स्माईलीदेखील चिकटवू शकतो. जेव्हा तुम्ही व्हाट्सअॅप कॅमेरामधून फोटो काढाल तेव्हा तुम्हाला तिथेच ही एडिटींग अॉप्शन दिसतील. त्यांचा वापर करून तुम्ही फोटो कींवा विडीओवर हवं ते लिहून पाठवू शकता आणि स्माईलीज पण अॅड करू शकता. इतकच नव्हे व्हाट्सअॅप कॅमेरामध्ये आता झूम चा फिचर मिळतोय त्यामुळे विडीओ शुट करताना आपल्याला याचा खास फायदा होईल. आणखी एक विशेष फिचर म्हणजे व्हाट्सअॅप कॅमेराचा फायदा तुम्हाला कमी प्रकाशात सेल्फी काढताना होणार आहे. कारण व्हाट्सअॅप कॅमेरावर जेव्हा तुम्ही सेल्फी काढाल तेव्हा तुमच्या मोबाईलची स्क्रीन एखाद्या फ्लॅशप्रमाणे काम करेल.
आतापर्यंत अशा सुविधा स्नॅपचॅटवर मिळत होत्या. पण व्हाट्सअॅपने सुद्धा या सुविधा उपलब्ध केल्यामुळे आपल्या नेटवीरांच्या वरच्या गप्पा अजून रंगणार आहेत यात तिळमात्र शंका नाही..
