दिनविशेष : वाचा लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कोणत्या गोष्टींचा पाया घातला..

लिस्टिकल
दिनविशेष : वाचा लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कोणत्या गोष्टींचा पाया घातला..

२० जून १८६९साली जन्मलेल्या लक्ष्मणराव किर्लोस्करांनी लोह उद्योगात क्रांती घडवून आणली. त्यांच्या संशोधन आणि उत्पादनांनी शेती व इतर उद्योगांच्या भरभराटीस हातभार लावला.  त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही हा वारसा पुढे चालवत किर्लोस्कर ग्रुपचं नांव यशाच्या शिखरावर ठेवलं आहे. 

आजच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १४८व्या जन्मदिनी पाहूयात त्यांच्या कारकिर्दीची काही क्षणचित्रे:-

१८८८- किर्लोस्कर बंधू समूहाची स्थापना

१८८८- किर्लोस्कर बंधू समूहाची स्थापना

लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जन्म कर्नाटकातला. त्यांनी पहिला उद्योग चालू केला तो मुंबईहून सायकली घेऊन तो विकण्याचा. ते जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते आणि काही काळ त्यांनी त्याकाळच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आणि आताच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या नावाने ओळखल्या जाणार्‍या (VJTI) कॉलेजात काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले. 

१९०३- भारतातला पहिला लोखंडी नांगर

१९०३- भारतातला पहिला लोखंडी नांगर

शेतीसाठी नांगर तर हवाच. लाकडी नांगरांना जास्त आयुष्य नव्हतं. हा नांगर बैलांनी ओढला जात असे. 

१९०४-पहिली लोखंडी नांगराची जाहिरात

१९०४-पहिली लोखंडी नांगराची जाहिरात

जाहिरातीचं युग फार जुनं आहे. विशेषत: लोकांना जुने मार्ग सोडून नव्या मार्गांना लावायचं असेल, तर तेव्हा जाहिरातीच कामी येतात.

१९१०-किर्लोस्करवाडी येथे कारखाना

१९१०-किर्लोस्करवाडी येथे कारखाना

आतापावेतो कर्नाटकात चाललेलं काम आताच्या सांगली जिल्ह्यातल्या एका खेड्याजवळ आलं.  तिथे उभारलेल्या कारखान्याशेजारी आताशा तिथं गांव वसलंय आणि तेही किर्लोस्करांच्याच नावानं. शेजारीच पलूस या गावातली लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणजेच ’लकि’ हायस्कूल ही खूप नावाजलेली शाळा आहे.

१९२६-भारतातला पहिला सेंट्रीफ्युगल पंप

१९२६-भारतातला पहिला सेंट्रीफ्युगल पंप

शेतीला पारंपारिकरित्या पुरवलं जाणारं पाणी पुरत नसे. अशा वेळेस या पंपांनी शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला.

१९२७-भारतातलं पहिलं डिझेल इंजिन

१९२७-भारतातलं पहिलं डिझेल इंजिन

स्वयंचलित इंजिनामुळं काय मदत होते हे आता सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.

१९४०-भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटर

१९४०-भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटर

१९४१-भारतातलं पहिलं लेथ मशीन

१९४१-भारतातलं पहिलं लेथ मशीन

लेथ मशीनशिवाय सुतारकाम आज अशक्य आहे. याचा पायाही किर्लोस्करांनीच घातला. 

 

स्त्रोत