राजस्थानातली लुम्बा राखीची परंपरा काय आहे ?

राजस्थानातली लुम्बा राखीची परंपरा काय आहे ?

सांस्कृतीक विविधता असलेल्या आपल्या देशात रक्षाबंधनाचा आजचा सण सर्वच राज्यात एकसारखा साजरा केला जातो.बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहीणीचे रक्षण करण्याचे वचन देतो अशी ही पवित्र परंपरा आहे.राजस्थानच्या काही प्रांतात एक वेगळी परंपरा पण आहे ज्याला लुम्बा राखी म्हटले जाते.या रिवाजानुसार घरातील नणंदा आपल्या भावाच्या पत्नीला राखी बांधतात. भावाची पत्नी ही तिच्या पतीची ‘अर्धांगिनी’ असल्याने तिला राखी बांधल्याशिवाय भावाला राखी बांधण्याचं ‘रक्षाबंधन’ पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणजेच बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही भावाप्रमाणेच त्याच्या पत्नीचीही असते.
जाता जाता एक नवा विचारही मांडतो आहे तो असा की आता सर्व महिला अबला नाही तर सबला झाल्या आहेत तर  बहीणींनी एकमेकींना राखी बांधायची नवी प्रथा सुरु करावी का ?