बॉस, उपवासाच्या दिवशी दुपारी पोटात भुकेने खलीबली केली की काय अवस्था होते हे आम्ही समजतो. पण आम्ही तुमचे खास दोस्त असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी, वडा, बटाट्याची भाजी, केळी, शेंगदाणे, खाऊन दिवस काढा असा फुक्कटचा सल्ला देणार नाही. आम्ही तुमची ओळख करून देतो आहे, उपासाला चालणाऱ्या एका वेगळ्या पदार्थाची जो महाराष्ट्रात फारसा खाल्ला जात नाही. या आयटमचं नाव आहे ‘मखाणा’. मखाणा म्हणजे कमळाचं ‘बी’. पांढरं शुभ्र, गोल मटोल, वजनाला हलकं आणि अत्यंत पौष्टिक कमळाचं बी खीर बनवून किंवा नुसतं तिखटा मिठासोबतही खाता येतं.

भाजलेल्या मखाण्याची 'बी' (स्रोत)
आता हे सगळं आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा आणि बायकोकडून किंवा मैत्रिणीकडून बनवून घ्या.
