‘ओला’ने बंगलोर ते उत्तर कोरीयासाठी तब्बल एवढे पैसे आकारले....वाचा ओला चा किस्सा !!

‘ओला’ने बंगलोर ते उत्तर कोरीयासाठी तब्बल एवढे पैसे आकारले....वाचा ओला चा किस्सा !!

मंडळी, ओला आणि उबर यांच्या अॅपचं काही खरं नाही. कधी काय करतील याचा काय माहित!! महिनाभरापूर्वी उबरच्या एका ड्रायव्हरने आपलं लोकेशन थेट अरबी समुद्रात दाखवलं होतं. आणि आता एक नवीन बातमी आली आहे. एका माणसाने गंमत म्हणून बंगलोर ते उत्तर कोरिया (किम भाऊचं गाव)पर्यंत ओला बुक केली आणि आश्चर्य ते काय? ओलाने ती ट्रीप चक्क मंजूर देखील केली आणि यासाठी आकारले तब्बल १ लाख ४९ हजार रुपये.

‘रोहित मेंदा’ नाव असलेल्या एका तरुणाने हा अनुभव त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ओलाने त्याची मागणी मान्य करत या प्रवासाची तारीख, वेळ आणि भाडं ठरवून रोहितला पद्धतशीरपणे उत्तर कोरियाला पोहोचवायची तयारी देखील केली होती. इतकंच काय, त्यांनी तर ड्रायव्हरचं नाव आणि मोबाईल नंबरदेखील पाठवला होता.

या गमतीदार अनुभवानंतर त्याने ‘ओला’ला ट्विटरवर याबाबतीत चांगलंच खडसावलं. यावर ओलाने आपल्या बचावात म्हटलं की ‘हे तांत्रिक बिघाडामुळे झालं असावं. तुम्ही तुमचा मोबाईल (भारतीय प्रथेप्रमाणे) रिस्टार्ट करा आणि पुन्हा प्रयत्न करा.’

मंडळी, रोहितने याआधी पण असाच प्रकार करून बघितला होता. त्याने बंगलोर ते अमेरिका अशी ट्रीप बुक केली आणि अर्थातच पुढे काय झालं ते सांगायची गरज नाही. ओलाने तीही ट्रीप मान्य केली होती.

आम्ही तुम्हाला कुठेही पोहोचवू शकतो हे त्यांना सिद्ध करायचं आहे बहुतेक. 

मंडळी हे ओला-उबरचं काही खरं नाही राव. हे लोक तर आपल्याला एक दिवशी चंद्रावर पण नेतील. चंद्रावर पण एकवेळ ठीक आहे भौ, पण उत्तर कोरिया म्हणजे ?? नको रे देवा !!
 

 

आणखी वाचा :

'उबर' ड्रायव्हरची कमाल...कार चक्क अरबी समुद्रात कशी पोहोचली भाऊ ??

का घ्यावी लागली ओलाला जाहिरात मागे?

 

टॅग्स:

ola

संबंधित लेख