या माणसाने असं कोणतं नाव निवडलं ज्यामुळे सरकार त्याला नाव बदलू देत नाहीये ?

या माणसाने असं कोणतं नाव निवडलं ज्यामुळे सरकार त्याला नाव बदलू देत नाहीये ?

‘रिग्रेट अय्यर’च्या कथेनंतर आज आम्ही आणखी एका माणसाच्या नावाची कथा घेऊन आलोय राव. हा माणूस गुजरातचा असून त्याचं नाव आहे ‘राजवीर उपाध्याय’. आता लगेच म्हणू नका या नावात काय आलंय मोठं. हे त्याचं खरं नाव आहे पण त्याने जे नाव निवडलंय ते जास्त मजेशीर आहे.

तर, राजीव हा एक रिक्षाचालक आहे. त्याने आपलं नाव बदलण्यासाठी सरकारकडे अर्ज केला पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. दुसरं कोणतं नाव असतं तर त्याचा अर्ज फेटाळला गेला नसता पण त्याने जे नाव निवडलं आहे ते अगदीच भलतं आहे भाऊ. त्याने निवडलेलं नाव आहे ‘RV155677820’.

स्रोत

तुम्ही बरोबर वाचलंत. हा ‘नंबर’ म्हणजेच त्याने निवडलेलं नाव आहे राव. राजवीरला असं वाटतं की आपल्या नावातून आपली जात आणि आपला धर्म दिसून येतो. त्यामुळे त्याने आपलं नाव ‘RV155677820’ असावं अशी इच्छा प्रकट केली आहे. या नव्या नावातील RV म्हणजे राजीव आणि उरलेला क्रमांक हा त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नावनोंदणी क्रमांक आहे.

राजवीरने २०१५ साली धर्माचा त्याग केला. धर्माचा त्याग केल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण आपल्या नावाचा देखील त्याग करावा. पण आपला देश धर्मनिरपेक्ष जरी असला तरी कायदेशीररीत्या धर्म सोडून नास्तिक होण्याला कायद्यात तरतूद नाही. याचाच अडसर त्याला आला. गुजरात मध्ये त्याचा अर्ज नाकारण्यात आल्यानंतर आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

राजवीरच्या नवीन नावावरून आम्हाला आयडियाची ती जुनी जाहिरात आठवली. अभिषेक बच्चनने त्यात घोषणा करताना म्हटलं होतं की 'कोई भी अपणे नाम से नही जाना जायेगा.'  आणि मग सगळे आपलं नाव बदलून मोबाईल नंबरला आपली ओळख बनवतात. तुम्ही सुद्धा पाहा ही अॅड फिल्म.

आणखी वाचा :

रिग्रेट अय्यरांच्या नावामागची गमतीशीर गोष्ट...तुम्हांला असं कोणतं नांव घ्यावंसं वाटेल, आणि का ??