का पडले या बाबांचे नाव बिर्याणी बाबा?

का पडले या बाबांचे नाव बिर्याणी बाबा?

७९ वर्षांचा माणूस  रोज ८००० लोकांच्या पोटाला बिर्याणीचा आधार देतोय आणि  ते सुद्धा गेल्या ४० वर्षांपासून. विश्वास बसत नाही? आम्ही बोलत आहोत विजयानगरम, आंध्रप्रदेशातील ‘अत्तहुल्ला शरीफ सतज कादिरी बाबा’ यांच्याबद्दल. त्यांचे अनुयायी त्यांना ‘बिर्याणी बाबा’ याच नावाने ओळखतात. ‘बिर्याणी बाबा’ नाव का? तर बाबा गरीब जनतेला रोज बिर्याणी जेवू घालतात. 

बाबांच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी लंगर मधले जेवण खुले असते. विशेष प्रसंगी जेवणार्‍यांचा आकडा ८००० ते १०००० पर्यंत जातो. एवढ्या लोकांचे पोट भरायचे म्हणजे अन्न देखील तितकेच लागणार. रोज २ टन तांदूळ, जवळ जवळ १०० किलो चिकन (१ क्विंटल) आणि मटण, शुद्ध तुपाचा वापर करून बिर्याणी तयार केली जाते. थांबा! जर तुम्ही शाकाहारी असाल तर शाकाहारी जेवण सुद्धा मिळेल. ‘चीमलपाडू दर्गा’ मध्ये प्रसाद म्हणून हे जेवण दिले जाते. मी कोणत्याही जाती धर्माला मनात नाही, मी फक्त सगळ्यांना एवढीच प्रार्थना करतो की "गरिबांची मदत करा कारण मानवाची सेवा एक प्रकारे देवाचीच सेवा असते".  या शब्दात बाबा आपल्या कामाकडे वारसा म्हणून पाहतात . हा वारसा त्यांना गुरु “खादर बाबा” यांच्या कडून मिळाला आहे. बाबा स्वतः जेवण तयार होण्यापासून ते जेवण ताटात उतरेपर्यंत सर्व कामांवर लक्ष ठेवून असतात. आत्तापर्यंत करोडो माणसांनी इथल्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे. धर्म-जात या पलीकडे जाऊन मानवी धर्म निभावण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अशा आपल्या ‘बिर्याणी बाबांना’ मनाचा मुजरा.