व्हिडिओ- मराठी पुस्तकाचं ट्रेलर , आणि ते ही चक्क हॉलीवूड स्टाईल

व्हिडिओ- मराठी पुस्तकाचं  ट्रेलर , आणि ते ही चक्क  हॉलीवूड स्टाईल

सिनेमाचं , मालिकेचं इतकंच काय, आजकाल वेबसिरीजचं ट्रेलर आणि टीझर्स आजवर तुम्ही पाहिली असतील. पण कधी पुस्तकाचं ट्रेलर पाहिलंय?  त्यातहे मराठी पुस्तकाचं? नक्कीच नसेल? 

लेखक अभिषेक ठमकेंनी यावर्षी ६०व्या महाराष्ट्रदिनाच्या दिवशी त्यांची कादंबरी प्रकाशित केलीय, तिचं नांव आहे- ’पुन्हा नव्याने सुरूवात’.  पण या पुस्तकाच्या जाहिरातीसाठी त्यांनी जो मार्ग घेतलाय तो मात्र एकदम वेगळा आहे. त्यांनी चक्क एक हॉलीवूड स्टाईलचं एक ट्रेलरच बनवलंय. 

इंग्रजीतल्या काही  पुस्तकांचे ट्रेलर यूट्यूबवर दिसतात, पण त्यात पुस्तकातली काही वाक्यं काही चित्रं किंवा लोकेशन्सच्या पार्श्वभूमीवर वाचलेली दिसतात. पण हे प्रकरण वेगळं आहे. अमेरिकन सिनेमांमधल्या अमेरिकेवर जगबुडी येणार्‍या सिनेमांतली काही दृश्यं एकत्र केल्यासारखं एकंदरीत हे ट्रेलर दिसतं आहे.

या आधीही या लेखकाची दोन-तीन पुस्तकं आली आहेत आणि ती खूप प्रसिद्ध झाली आहेत असं लेखकाचं म्हणणं आहे, पण ती पुस्तकं तुम्ही-आम्ही ऐकल्याची शक्यता जास्त आहे. असो,  बोभाटाला एका वेगळ्या प्रयोगाबद्दल  या  ट्रेलरचं कौतुक आहे.  हे पुस्तक त्यांनी एकाच वेळी  वेगवेगळ्या  सोशल प्लॅटफॉर्मवर फुकट  प्रकाशित केलं आहे आणि इथे ही  वाचण्यासाठी उपलब्ध आहे.