मराठवाड्यावरचं पाणी संकट: उपग्रहांवरचे फोटों सांगताहेत पाणीसाठे किती आटले याची कहाणी..

लिस्टिकल
मराठवाड्यावरचं पाणी संकट: उपग्रहांवरचे फोटों सांगताहेत पाणीसाठे किती आटले याची कहाणी..

गेली कित्येक दशके मराठवाड्याला टॅंकरवाडा म्हणून ओळखलं जात आहे. पाण्यावरतीच शेती अवलंबून असल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करत आहेत. दुष्काळाने मराठवाड्याचा कणाच मोडून टाकलाय. यावर्षी तर पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वेने पाणी आयात करण्याची वेळ मराठवाड्यावर आली आहे. महिन्यातून एकदा पाणी येण्याचे दु:ख किमान एकदा सहन केल्याशिवाय त्यातलं गांभीर्य कळायचं नाही.

दरवर्षी ही परिस्थिती अधिकच चिघळत चाललीय. नासाच्या लॅंडसॅट-८  उपग्रहावरून घेतलेल्या  छायाचित्रांचं ’मॅपबॉक्स’च्या मदतीने परिक्षण करताना मराठवाडा कसा होरपळतोय हे कळून येतं. आणि हे परीक्षण फक्त गेल्या वर्षी १ एप्रिल २०१५ आणि यावर्षी ३ एप्रिल २०१६ या दिवशी घेतल्या गेलेल्या फोटोजचं आहे. एका वर्षात इतका फरक पडला असेल तर आणखी काही वर्षांत काय संकट ओढवेल याची कल्पनाच करता येत नाहीय. 

नाथसागर तलाव

नाथसागर तलाव

नाथसागर हा जायकवाडी धरणामुळे तयार झालेला तलाव. शेती आणि उद्योगाना पाणीपुरवठा करणं हे त्याचं काम. तोही हळूहळू आटताना दिसतोय.

२. उज्जनी धरण

२. उज्जनी धरण

भीमा नदीवरच्या उज्जनी धरणामुळे तयार झालेला तलाव  काही वर्षांत दिनेनासा होईल.  

३. माजलगांव तलाव

३. माजलगांव तलाव

बीड जिल्ह्यातल्या माजलगांव इथले लहान पाणीसाठे आपलं अस्तित्व गमावून बसलेयत. जे शिल्लक आहेत, त्यांचा आकार आणि क्षमता, दोन्हीही फारशा आशादायक नाहीत.