टेलर जेव्हा संस्थान सांभाळतो
१८२४ साली कारकून होण्यासाठी आलेला मेडोज टेलर पुढे विवाहबद्ध झाला.हैदराबाद संस्थानातील एक मोठ्या ब्रिटिश अधिकार्याच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. यानंतर सुमारे तीन वर्षांची रजा घेऊन १८३६ च्या सुमारास पत्नीसह टेलर इंग्लंडला परतला. इंग्लंडला त्याचे वास्तव्य सुमारे तीन वर्षांचे झाले. याच दरम्यान टेलरने 'कन्फेशन्स ऑफ अ ठग' ही कादंबरी पूर्ण केली, आणि १८३९मध्ये ती प्रकाशित झाली. १८४१ च्या सुमारास पत्नीसह जेव्हा टेलर भारतात परतला तेव्हा आपल्याला निजाम परत नोकरीत घेईल का, याची शाश्वती त्याला वाटत नव्हती. पण एक कठीण काम टेलरची वाट पाहत होते. जनरल फ्रेझर यांनी टेलरला भेटायला बोलावले आणि शोरापूर संस्थानाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळण्याचे आव्हानात्मक काम आहे, ते करायला तयार आहेस का असा प्रश्न केला.


