निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे आकर्षण अनेकांना असते. वेळ येत नाही तोवर आपण इंटरनेट, नोकऱ्या आणि सिमेंटचं जंगलच सोडून असं राहू-तसं राहू याबद्दल बरेचजण बढायाही मारतात. पण प्रत्यक्ष सर्वकाही सोडून जंगलात राहायला जायची वेळ आली की सहसा कुणीही तयार होणार नाही. पण कर्नाटकातील एक माणूस खरंच गेली १७ वर्षं एकटाच जंगलात राहत आहे. एवढे दिवस तो कुठे आहे याबद्दल कुणालाही पत्ता नव्हता.
चंद्रशेखर हे त्यांचं नाव. त्यांचं वय ५६ वर्षं आहे. हे चंद्रशेखर जंगलात खूप आत आपल्या अँबेसेडर गाडीत राहत होते. दक्षिण कन्नड येथील अडताळे आणि नेक्कारे या दोन खेड्यांच्या मध्ये हे जंगल आहे. मात्र हे चंद्रशेखरबाबा तिथे स्वतःच्या इच्छेने राहाय्ला गेले असतील असे वाटत असेल तर थांबा!!



