आजही बुद्धीची कामं ही बरेचदा पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. पण जगातले काही महत्त्वाचे शोध हे स्त्रियांनीच लावले आहेत. त्या शोधांमुळे आपलं आजचं आयुष्य इतकं आरामाचं झालं आहे, की आपण त्या स्त्रियांचे उपकार मानायलाच हवेत. पावसाळ्यात वायपर्सशिवाय कुठलीच गाडी चालवता येत नाही. या वायपर्सचा शोधही एका बाईनंच लावला हे माहित आहे का तुम्हांला?
वाचा तर मग या वायपर्समागची कहाणी..
कारच्या वायपर्सचा शोध लावला मेरी अँडरसन नावाच्या अमेरिकन बाईनं. ती रिअल इस्टेट डेव्हलपर होती, तिचं रँच म्हणजे भरपूर जनावरे असणारं शेतघर होतं, ती उत्तमोत्तम प्रतीची द्राक्षं पिकवण्यासाठी संशोधन करायची, द्राक्षं पिकवायची आणि तेव्हाच तिने या काच साफ करण्याच्या ऑटोमॅटिक यंत्राचा शोध लावला.


